दहावीच्या विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना
***उतारा आणि कविता वाचून जे प्रश्न सोडवायचे असतात त्यामध्ये तुमचं वाचन कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उतारे डोळ्याखालून जाणे गरजेचे आहे. या प्रश्नांना जास्तीत जास्त वेळ जातो त्यामुळे प्रत्येक उतारा किंवा कवितेचे प्रश्न किती मिनिटात सोडवायचे ते पण ठरवून घ्या व ते प्रश्न झाला की पुढच्या प्रश्नाकडे जा.
***प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि एकूण प्रश्नासाठी असलेले गुण लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नाचे उत्तर लिहिताना किती लिहायचे याला महत्त्व द्या.
***धड्यांची नावे लेखकांची नावे त्यातील पात्रे व प्रसंग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
***आपल्या स्वतःच्या शब्दात सर्व प्रश्नांची उत्तरे द्या व्याकरणाची काळजी घ्या शब्दलेखन व्यवस्थित तपासा.
***मी दिलेल्या प्रश्नपत्रिका लैंग्वेज स्टडी तसेच मागील वर्षाचे बोर्डाचे पेपर सोडण्याचा प्रयत्न करा.
***कवितेच्या आणि उताऱ्यातील ओळी उत्तर म्हणून जशाच्या तशा लिहिण्याचा प्रयत्न करू नका त्याचा गुणावरती परिणाम होतो. उत्तर तुमच्या भाषेतच लिहिण्याचा प्रयत्न करा.
***एका प्रश्नाचे उत्तर एकदाच लिहा दोन वेळा लिहिलेल्या उत्तरात पहिले उत्तर फक्त तपासले जाते.
***प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास व उपप्रश्नास जो प्रश्न क्रमांक असेल तोच उत्तरपत्रिकेत लिहावा.
***उत्तरपत्रिकेत दोन्ही बाजूस समास सोडू नये.
***मुख्य नवीन प्रश्न नवीन पानावरती सुरू करावा.
***एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर ते तसेच सोडून पुढे चला त्या प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका शेवटी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा कारण येत नसलेल्या प्रश्नावर जास्त वेळ घालवला तर शेवटी उत्तरपत्रिका अर्धवट राहते व येणारे प्रश्न ही राहतात
***उत्तर पत्रिका स्वच्छ ठेवा खाडाखोड टाळण्याचा प्रयत्न करा एकाच अक्षरावर सारखे डबल गिरवू नका म्हणजे ओवर राईट लिहू नका. शुद्ध, सुटसुटीत आणि चांगलं टाप-टिपीत लिखानावर भर द्या.
***उत्तरपत्रिकेत काळ्या किंवा निळ्या फक्त एकाच पेनचा वापर करा
***काही कच्चे लिखाण करायचे असल्यास पेन्सिलने करावे उत्तरपत्रिकेत डाव्या बाजूच्या पानावरती कच्चे करावे व वरती पेन्सिलने *कच्चे/रफ* असे लिहावे.
***उत्तरपत्रिकेत प्रश्नपत्रिकेतील आकृती/डायग्रॅम पेन्सिलने काढल्या तरी चालतील.
***उत्तरपत्रिकेत *लाल किंवा हिरव्या* पेनचा वापर करण्यास *परवानगी नाही*
***उत्तरपत्रिकेच्या कोणत्याही आतील पानावरती तुमचा परीक्षा नंबर किंवा मोबाईल नंबर कुठेही लिहू नका. बोर्डाकडून त्याच्यावरती कारवाई होते.
***उत्तरे आधोरेखित करायचे असेल म्हणजेच उत्तराखाली रेष मारायचे असेल तर - पेनने उत्तरपत्रिका लिहिलेले आहे त्याच *पेनने किंवा पेन्सिलने* उत्तरे अधोरेखित करावीत. दुसऱ्या कलरचा पेन अधोरेखीत करण्यासाठी वापरू नये.
***उपलब्ध असलेला वेळ वाया घालवू नका. परीक्षेच्या कालखंडात टीव्ही अजिबात स्वरूप पाहू नये. अभ्यासापासून आपले मन परावृत्त होते.
***आत्मविश्वास ठेवा योग्य विश्रांती म्हणजे झोप घ्या सोप्या शब्दात पण आपल्या भाषेतच लेखन करा.
सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा
कन्या प्रशाला येडेमच्छिंद्र,
तालुका - वाळवा, जिल्हा - सांगली.
No comments:
Post a Comment