Tuesday, July 30, 2024

देशभक्ति गीत

                 

               देशभक्ति गीत

1)     फिर भी दिल है हिन्दुस्तानी

हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी

जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी

अपनी छतरी तुमको दे दें कभी जो बरसे पानी

कभी नए पैकेट में बेचें तुमको चीज़ पुरानी

फिर भी दिल है हिन्दुस्तानी

नींद उड़ रही है …


थोड़े अनाड़ी हैं थोड़े खिलाड़ी

रुक रुक के चलती है अपनी गाड़ी

हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी

हम ऐसे भी हैं हम हैं वैसे भी

हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी

उल्टी सीधी जैसी भी है अपनी यही कहानी

थोड़ी हममें होशियारी है थोड़ी है नादानी

थोड़ी हममें सच्चाई है थोड़ी बेईमानी

फिर भी दिल है …


आँखों में कुछ आँसू हैं कुछ सपने हैं

आँसू और सपने दोनों ही अपने हैं

दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है

उम्मीद का दामन छूटा तो नहीं है

हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी

थोड़ी मजबूरी है लेकिन थोड़ी है मनमानी

थोड़ी तू तू मैं मैं है और थोड़ी खींचातानी

हममें काफ़ी बातें हैं जो लगती हैं दीवानी

फिर भी दिल है ..

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

       मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन


मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन

मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन

शांति का उन्नति का प्यार का चमन

इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा मन

ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन

जानेमन जानेमन जानेमन

मेरा मुल्क मेरा देश…


इसकी मिट्टी से बने, तेरे मेरे ये बदन

इसकी धरती तेरे-मेरे वास्ते गगन

इसने ही सिखाया हमको जीने का चलन

इसके वास्ते निसार है…


अपने इस चमन को स्वर्ग हम बनायेंगे

कोना-कोना अपने देश का सजायेंगे

जश्न होगा ज़िन्दगी का होंगे सब मगन

इसके वास्ते निसार है…


मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन

शांति का उन्नति का प्यार का चमन

इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा मन

ऐ वतन ऐ वतन ऐ वतन

जानेमन जानेमन जानेमन


कल के सारे वादे आज टूटने लगे

हाथ में जो हाथ थे, वो छूटने लगे

काश लौट आये पहले जैसा अपनापन

ऐ वतन…


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

     3)   मेरे देश की धरती सोना उगले


मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती

मेरे देश की धरती …


बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं

ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुस्काते हैं

सुनके रहट की आवाज़ें यूँ लगे कहीं शहनाई बजे

आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे,

मेरे देश …


जब चलते हैं इस धरती पे हल ममता अंगड़ाइयाँ लेती है

क्यूँ ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है

इस धरती पे जिसने जनम लिया, उसने ही पाया प्यार तेरा

यहाँ अपना पराया कोई नहीं, है सब पे है माँ उपकार तेरा,

मेरे देश …


ये बाग़ है गौतम नानक का खिलते हैं चमन के फूल यहाँ

गांधी, सुभाष, टैगोर, तिलक, ऐसे हैं अमन के फूल यहाँ

रंग हरा हरी सिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से

रंग बना बसंती भगत सिंह रंग अमन का वीर जवाहर से,

मेरे देश …

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


         4)  धरती सुनहरी अंबर नीला  


ओ.. अंबर हेठाँ धरती वसदी एथे हर रुत हँसदी हो

किन्ना सोणा देस है मेरा देस है मेरा, देस है मेरा

किन्ना सोणा देस है मेरा देस है मेरा, देस है मेरा देस है मेरा


धरती सुनहरी अंबर नीला हो.. धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला

ऐसा देस है मेरा हो.. ऐसा देस है मेरा ऐसा देस है मेरा हाँ.. ऐसा देस है मेरा

बोले पपीहा कोयल गाये.. बोले पपीहा कोयल गाये सावन घिर के आये

ऐसा देस है मेरा हो.. ऐसा देस है मेरा ऐसा देस है मेरा हाँ.. ऐसा देस है मेरा


कोठे ते काग बोले ओये चिट्ठी मेरे माहिए दी

विच मेरा वि नाम बोले ओये चिट्ठी मेरे माहिए दी


गेंहू के खेतों में कंघी जो करे हवाएं

रंग-बिरंगी कितनी चुनरियाँ उड़-उड़ जाएं

पनघट पर पनहारन जब गगरी भरने आये

मधुर-मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए,

लो सुन लो क़दम-क़दम पे है मिल जानी..

क़दम-क़दम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी

ऐसा देस है मेरा हो.. ऐसा देस है मेरा ऐसा

देस है मेरा हाँ.. ऐसा देस है मेरा


ओ..मेरी जुगनी दे धागे बांधे

जुगनी ओस दे मूंह तो फब्बेय

जीनु साड इश्क दी लग्गे ओये सानेरया दा लेंदी है

वीर मेरेया जुगनी कहंदी है ओ नाम सही पा लेंदी है

ओ दिल कड़ लिता ई जींद मेरिये


बाप के कंधे चढ़ के जहाँ बच्चे देखे मेले

मेलों में नट के तमाशे, कुल्फ़ी के चाट के ठेले

कहीं मिलती मीठी गोली, कहीं चूरन की है पुड़िया

भोले-भोले बच्चे हैं, जैसे गुड्डे और गुड़िया

और इनको रोज़ सुनाये दादी नानी हो..

रोज़ सुनाये दादी नानी इक परियों की कहानी

ऐसा देस है मेरा हो.. ऐसा देस है मेरा ऐसा देस है मेरा

हाँ.. ऐसा देस है मेरा


सदके सदके जांदी है मुटियारे नि

कंदा चुभा फिर पैर बांकी नारे नि ओये

नि अडिये कंदा चुभा फिर पैर बांकी नारे नि

कौन कड़े तेरा कन्दरा मुटियारे नि

कौन सहे तेरी पीड बांकिये नारे नि ओये

नि अडिये कौन सहे तेरी पीड बांकिये नारे नि हो..


मेरे देस में मेहमानों को भगवान कहा जाता है

वो यहीं का हो जाता है, जो कहीं से भी आता है

आ.. तेरे देस को मैंने देखा, तेरे देस को मैंने जाना आ..

तेरे देस को मैंने देखा, तेरे देस को मैंने जाना

जाने क्यूँ ये लगता है, मुझको जाना पहचाना

यहाँ भी वही शाम है, वही सवेरा ओ.. वही शाम है, वही सवेरा

ऐसा ही देश है मेरा जैसा देश है तेरा वैसा देश है तेरा

हाँ.. जैसा देश है तेरा ऐसा देश है मेरा

हो.. जैसा देश है तेरा ऐसा देश है मेरा

हाँ.. जैसा देश है तेरा ऐसा देश है मेरा हाँ.. वैसा देश है तेरा



☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

   5)   देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग

यहाँ की बोली मे रंगोली सात रंग

यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग

यहाँ की बोली मे रंगोली सात रंग


धानी पगड़ी पहने मौसम है

नीली चादर ताने अम्बर है

नदी सुनहरी हरा समुन्दर है रे सजीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला..


वंदेमातरम.. वंदेमातरम.. वंदेमातरम.. वंदेमातरम..


सिन्दूरी गालो वाला सूरज जो करे ठिठोली

शर्मीले खेतो को ढंक ले चुनर पीली पीली

घूंघट मे रंग पनघट मे रंग चम् चम् चमकीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला..

हो.. हो.. हो.. हो..


अबीर गुलाल से चेहरे है यहां मस्तानो की टोली

रंग हसी मे रंग ख़ुशी मे रिश्ते जैसे होली

बातो मे रंग यादो मे रंग रंग रंग रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला..


इश्क का रंग यहां पर गहरा चढ़ के कभी न उतरे

सच्चे प्यार का ठहरा सा रंग छलके पर न बिखरे

रंग अदा मे रंग हया मे है

रसीला देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला.

.

यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग

यहाँ की बोली मे रंगोली सात रंग

धानी पगड़ी पहने मौसम हैं

नीली चादर ताने अम्बर हैं

नदी सुनहरी हरा समुन्दर है रे सजीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला..


हो.. रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला

देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला..

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Tuesday, July 9, 2024

या भारतात बंधु - भाव नित्य वसू दे


या भारतात बंधु - भाव नित्य वसू दे


या भारतात बंधु-भाव नित्य वसू दे ।

दे वरचि असा दे ।।

हे सर्व पंथ - संप्रदाय एक दिसू दे ।

मतभेद नसू दे ।।धृ0।।

नांदोत सुखे गरिब-अमिर एकमतानी ।

मग हिंदू असो, ख्रिश्‍चन वा हो इस्लामी ।

स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे ।

दे वरचि असा दे ।।१।।

सकळांस कळो, मानवता, राष्ट्रभावना ।

हो सर्वस्थळी मिळूनि, समुदाय-प्रार्थना ।

उद्योगि तरुण वीर, शीलवान दिसू दे ।

दे वरचि असा दे ।।२।।

हा जातिभाव विसरुनिया एक हो अम्ही ।

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी ।

खळ-निंदका-मनीही, सत्य न्याय वसू दे ।

दे वरचि असा दे ।।३।।

सौंदर्य रमो घरघरांत स्वर्गियापरी ।

ही नष्ट होऊ दे विपत्ति, भीती बोहरी ।

तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसूदे ।

दे वरचि असा दे ।।४।।

Wednesday, May 1, 2024

महाराष्ट्र गीत

                

                  महाराष्ट्र गीत


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा


रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा


भीति न आम्हां तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा

दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा


काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्रमाझा !!!!

            महाराष्ट्र दिन व 

          कामगार दिनाच्या 

            हार्दिक शुभेच्छा  

Friday, March 22, 2024

होळी

                                होळी 


हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही. असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.'


                               


होळी हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. वसंत ऋतूचा महिना येताच त्याची प्रतीक्षा सुरू होते. होलिका दहन हा सण फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केला जाण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार होलिका दहन हा सण वाईटावर विजय मिळवण्याचे प्रतीक मानले जाते. होळी हा सांस्कृतिक, पारंपारिक आणि धार्मिक सण आहे. या सणाचा उत्साह हा वेगवेगळ्या पद्धतीने देशभरात पाहायला मिळतो. होळी हा सण परस्पर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनेचा सण देखील मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना रंगात भिजवतात. घरोघरी गुढ्या आणि पदार्थ तयार केले जातात. या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावतात व तसेच होळीच्या शुभेच्छा देखील देतात. अशा परिस्थितीत यावर्षी होळीची नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊयात…

 पौर्णिमा तारीख :
फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी करण्याची पद्धत आहे. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 09:54 वाजता सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता संपेल.

होलिका दहन 2024 :
24 मार्च रोजी होलिका दहन आहे. या दिवशी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 11:13 ते 12:27 पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला होलिका दहनासाठी एकूण 1 तास 14 मिनिटे वेळ आहे.

होळी 2024 कधी आहे? :

होलिकेच्या दुसऱ्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. म्हणून यावर्षी होळी 25 मार्च रोजी साजरी होणार आहे. या दिवशी देशभरात मोठ्या थाटामाटात होळी हा सण साजरा केला जाणार आहे..

*होळीची कथा*

अशी आहे होळी सणाची आख्यायिका

जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.

होळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन सण साजरा केला जातो. धुलीवंदनामुळे सर्व नागरिक एका ठिकाणी येतात. धुलीवंदनाच्या दिवसी एकमेकांना रंग लावला जातो. लहान लहान मुले पिचकारी मध्ये कलर भरून एकमेकांना रंगवून दिवसभर आनंद लुटतात.


मुलांचा होळी हा सर्वात आवडता सण आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत लहान लहान मुले जल्लोष साजरा करतात.

भारतीय शेतकरी होळीला विशेष महत्व देतात. होळीच्या निमित्ताने कृष्ण आणि बळीराम यांना आठवून त्यांचे पूजन मोठ्या आनंदात केले जाते. शेतात पिकलेल्या धान्याबाद्द्ल देवांचे आभार मानले जातात.

🌹रंग, उत्साह आणि खुशीत तुमचे जीवन भरावे, असा हार्दिक इच्छुक, रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹



Sunday, February 18, 2024

2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती

  2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती

                           


                               




हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. राज्य सरकारकडून १९ फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या वर्षी, सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी करणार आहे.


                               


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास

१८७० साली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.

लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिकरित्या साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले. छत्रपती शिवाजी महाराजचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजची जयंती साजरी केली जाते.

                      🙏🙏🙏🙏🙏


Saturday, November 18, 2023

क्रिकेटच्यादोन तिकिटांचा परतावा..

     🥎🥎🏆🏆🏆


*मंत्र्याला १९८३च्या फायनलची दोन तिकिटं नाकारली, म्हणून इंदिरा गांधींनी डायरेक्ट वर्ल्ड कप स्पर्धाच भारतात आणली*


*हा इतिहास माहीत आहे का?*


🏆🏆🏆🏆🏆



१९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. हा विजय भारताच्या दृष्टीनं अनेक कारणांसाठी खास होता. भारतानं त्यावेळच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करण्याचा भीम पराक्रम केला होता. ज्या ठिकाणावरून क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली त्या इंग्लंडच्या भूमीवर भारतानं आपली प्रतिभा सिद्ध केली होती.


*जागतिक क्रिकेटमध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येण्याच्या दिशेनं ते पहिलं पाऊल होतं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताचं जगभर नाव झालं. खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. मायदेशी आल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींनी खेळाडूंसाठी खास मेजवानीचं आयोजन केलं. ठिकठिकाणी त्यांचे सत्कार करण्यात आले. एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये आनंदीआनंद होता.*


मात्र, या सर्व गोंधळात एक व्यक्ती अशी होती. जी १९८३च्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अपमानित झाली होती. गोऱ्या साहेबांनी त्या व्यक्तीचा अपमान केला होता अन् तेही मॅचच्या तिकीटासारख्या अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी.


*१९८३ वर्ल्डकप फायनलच्या केवळ दोन तिकीटांमुळं पुढील काही वर्षात इंग्लंडला क्रिकेट साम्राज्याच्या सिंहासनावरून पायउतार व्हावं लागलं. त्यामागे त्याचं अपमानित झालेल्या भारतीय व्यक्तीची चाणक्यनीती होती.*


ही व्यक्ती कोण होती? तिनं असं काय केलं, ज्यामुळं जागतिक क्रिकेटमधील इंग्लंडच्या साम्राज्याला सुरुंग लागला? यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख…



...... अगोदर उल्लेख केल्याप्रमाणं *ही गोष्ट सुरू होते १९८३च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेपासून*. ज्यावेळी वर्ल्डकप स्पर्धा सुरू होती तेव्हा, भारताचे क्रेंदीय शिक्षण मंत्री *सिद्धार्थ शंकर रे* इंग्लंड दौऱ्यावर गेलेले होते. त्याच दरम्यान भारतीय संघ इंग्लंडमध्ये वर्ल्डकप फायनल खेळणार होता. *वर्ल्डकप फायनलमध्ये आपल्या देशाच्या संघाला प्रत्यक्ष खेळतानं पाहण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते, अशा विचार करून सिद्धार्थ रे यांनी फायनल पाहण्याचा विचार केला.*


*फायनलची तिकीटे मिळवण्यासाठी त्यांनी आपले सहकारी मंत्री आणि बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन के पी साळवे यांना फोन केला*. साळवेंनी आयोजक असलेल्या इंग्लिश क्रिकेट बोर्डाशी संपर्क करून दोन एक्स्ट्रा तिकिटांची मागणी केली. साळवेंना मिळालेलं उत्तर अतिशय धक्कादायक होतं. सध्याच्या काळात जर एखाद्या देशाच्या क्रिकेट बोर्ड अध्यक्षाला असं उत्तर मिळालं तर त्याचं नक्कीचं मोठं आंतरराष्ट्रीय भांडवलं होईल.


*आयोजकांनी बीसीसीआय अध्यक्ष साळवेंना दोन तिकीटं देण्यास स्पष्ट नकार दिला*. तुम्हाला तुमच्या वाट्याची दोन तिकीट अगोदरच देण्यात आलेली आहेत. पाहिजे तर ती तुम्ही वापरू शकता. यापलिकडे एकही एक्स्ट्रा तिकीट मिळणार नाही, असं आयोजकांनी साळवेंना सांगितलं.


ही गोष्ट नक्कीच धक्कादायक होती. *इंग्लंड क्रिकेट बोर्ड साळवेंना दोन तिकिटं अगदी सहज उपलब्ध करून देऊ शकत होत. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. उलट त्यांनी साळवेंचा अपमान केला*. आपल्या बोर्डातील *सर्व सदस्यांसाठी इंग्लंड तिकिट राखीव ठेवत असे. त्यांचं कारण देऊन ब्रिटिशांनी भारतीय मंत्र्याला तिकिट दिलं. प्रत्यक्षात पाहिलं तर, *इंग्लंडचा संघ फायनलमध्ये नाही म्हणून इंग्लिश क्रिकेट बोर्डातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामना पाहण्यास नकार दिला होता*.


*फायनलचा सामना सुरू असताना व्हिआयपी स्टँडमधील अनेक खुर्च्या उताण्या पडलेल्या होत्या. साळवेंनी ही गोष्ट आपल्या मनात कोरून ठेवली होती. आपल्या अपमानाची मोठी किंमत वसूल करण्याचा निश्चय त्यांनी केला होता*. त्यासाठी त्यांना क्रिकेटच मदत करणार होतं.


*भारतीय संघ वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर इंदिरा गांधीनं एक मेजवानी आयोजित केली होती. त्याच वेळी साळवेंनी गांधींच्या कानावर आपल्या सोबत घडलेली घटना घातली होती.*


 *इंदिरा गांधी अतिशय खमकी बाई होती*. 


*आपल्या मंत्र्याचा झालेला अपमान नक्कीच त्यांना रुचला नव्हता*. याबाबत शक्य त्या गोष्टी करण्याच्या सूचना गांधींनी साळवेंना दिल्या. *१९८७चा क्रिकेट वर्ल्डकप भारतात आणण्याची आपली तयारी आहे फक्त त्यासाठी पैसा पाहिजे असल्याचं साळवे इन्दिरा गांधींना म्हणाले होते*.


*साळवेंचा एक शब्द* आणि *गांधींनी थेट उद्योगपती धीरूभाई अंबानींना फोन फिरवला. जर बीसीसीआयनं क्रिकेट वर्ल्डकप भारतात आणला तर तुम्ही प्रायोजकत्व स्वीकारणार का? हा एकच प्रश्न इन्दिरा गांधींनी केला होता*. त्यावर *धीरूभाई अंबानींनी दिलेलं उत्तर ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. क्रिकेट वर्ल्डकप भारतात यावा यासाठी धीरूभाई ब्लँक चेकवर सही करण्यास तयार होते*.


*देशाचे पंतप्रधान आणि क्रिकेटवेड्या उद्योगपतीचा पाठिंबा मिळवून साळवेंनी आपली मोहिम सुरू केली.* त्यासाठी त्यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केली. क्रिकेटवरील ब्रिटिशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आपल्याला सहकार्य करावं, *अशी विनंतीवजा सूचना साळवेंनी पाकिस्तानी एअर चीफ मार्शल नूर खान यांना केली. पाकिस्ताननं भारतासोबत मिळून वर्ल्डकप आयोजित करण्याची तयारी दर्शवली*.

आयसीसीच्या मिटिंगमध्ये श्रीलंकेनं देखील भारताला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या तीन आशियाई देशांचा एक ब्लॉक तयार झाला होता. *आता साळवेंना फक्त एक मोठा मासा गळाला लावायचा होता. तो मासा म्हणजे ‘व्हेटो’पावर असलेला देश ऑस्ट्रेलिया होता*. जर १९८७मध्ये क्रिकेट वर्ल्डकप भारतामध्ये आला तर प्रस्तावित रोटेशन पॉलिसीनुसार त्यानंतर ऑस्ट्रेलियाला यजमान पद मिळेल, ही गोष्ट साळवेंनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या गळी उतरवली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं क्लोज बॅलेटमध्ये भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.त्यानंतर साळवेंनी आयसीसीमधील पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इतर असोसिएट दर्जाच्या राष्ट्रांना हाताशी धरून वर्ल्डकप इंग्लंडबाहेर हलवण्याचा ठराव बहुमतानं जिंकला. या सगळ्या कामात साळवेंना जगमोहन दालमियांचं मोलाचं सहकार्य लाभलं.


 *भारतानं बहुमत जिंकल्यानंतर देखील इंग्लंडनं, सामन्यांचं थेट प्रेक्षपण, खेळांडूंची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था असे कितीतरी प्रश्न उपस्थित करून भारताची नाचक्की करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतानं इंग्लंडच्या प्रत्येक प्रश्नाला पद्धतशीर प्रत्त्युतर तयार ठेवलं होत. शेवटी ब्रिटिशांना भारतासमोर हार पत्करावी लागली आणि १९८७मध्ये पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप इंग्लंडबाहेर खेळवण्यात आला.*



१९८७ चा वर्ल्ड कप हा *"ट्रेंडसेटर"* ठरला. 


या विश्वचषकामुळं जागतिक क्रिकेटची पुनर्रचना झाली. आयसीसीमधील समीकरणं बदलली गेली. व्हेटो पावरच्या शस्त्रामुळं जागतिक क्रिकेटमधील निर्णयांवर वर्चस्व गाजवणाऱ्या इंग्लंडचा माज उतरवण्याचं काम या वर्ल्डकपनं केलं.पहिल्यांदा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा इंग्लंडच्या बाहेर गेली. जागतिक क्रिकेटमधील इतर देशांनी पहिल्यांदा आयसीसीमध्ये आवाज उठवण्यास सुरुवात केली होती.


*क्रिकेटच्या जन्मस्थानापासून वर्ल्ड कप दूर हलवणं नक्कीचं सोपं नव्हतं*.


.... त्यासाठी दोन राष्ट्रं, जागतिक नेते, राजकारणी, क्रिकेट प्रशासक आणि व्यावसायिक यांच्यात गुंतागुंतीची बोलणी आवश्यक होती. जगातील कोणत्याही देशाला वर्ल्ड कप स्पर्धा आपल्या दारापर्यंत नेण्यात यश आलं नव्हतं. मात्र, भारतानं ही गोष्ट साध्य करून दाखवली होती ते ही *फक्त दोन तिकिटांचा परतावा म्हणून !*


                सौजन्य-  व्हाट्सअप पोस्ट

🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Tuesday, October 3, 2023

ग्राम्यबोली



                    *🔸ग्राम्यबोली🔸*


*_⊱━━━━━✥⊱⊰༺☬༒☬༻⊱⊰✥━━━━━⊱_*


आपआपल्या मुलांना हा मेसेज आवश्य वाचायला द्या व समजावूनही द्या. ग्रामिण भाषेचे आणि ग्रामिण बोली भाषेचे अगाध ज्ञान. 


*कावळे -*

गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे कावळे . 


*कालवण / कोरड्यास –*

 पातळ भाजी.


*आदण -*

घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणत.


*कढाण -*

मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात.


*घाटा -*

हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला घाटा म्हणतात.


*हावळा -*

हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात.


*कंदुरी -*

पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला कंदुरी म्हणत.


*हुरडा -*

ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात. त्यास हुरडा म्हणतात.


*आगटी -*

हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसं भाजली जातात त्याला आगटी म्हणतात.


*कासूटा, काष्टा -*

पूर्वी सर्रास धोतर नेसलं जायचं. धोतराची गाठ कमरेभोवती बांधल्यानंतर राहिलेल्या धोतराच्या निर्‍या घालून पाठीमागे खोचल्या जायच्या त्याला कासूटा म्हणत आणि हाच प्रकार स्त्रियांनी केला तर त्याला काष्टा म्हणत.


*घोषा -*

पूर्वी ग्रामीण भागात पाटील किंवा उच्चभ्रू लोकांध्ये ज्या स्त्रिया लग्न होऊन यायच्या त्यांना घोषा पद्धत असायची. म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर साडीच्या वरून शेळकट गुंडाळायचे व ते पूर्ण तोंडावर घ्यायचे. शेळकट पातळ असल्यामुळे शेळकटातून बाहेरचे दिसायचे. परंतु चेहरा दिसायचा नाही. शेळकट नसेल तर पदर तोंडावर असा ओढायचा की जेणेकरून चेहरा दिसणार नाही.


*दंड -*

एखाद्या चुकीच्या कामामुळे शासन आर्थिक दंड करते तो वेगळा. येथे दंड म्हणजे पूर्वी कपड्यांची कमतरता असायची. अशा वेळी स्त्रिया एखादी साडी जुनी झाली तरा त्याचा जीर्ण झालेला भाग कापून काढायचा आणि दुसर्‍या जुन्या साडीचा चांगला भाग काढायचा आणि हे दोन चांगले भाग शिवून एक आडी तयार करायची.याला दंड घातला म्हणायचे.


*धडपा -*

साडीचा भाग जीर्ण झाला असेल आणि त्याला दंड लावायला दुसरी साडी नसेल तर साडीचा जीर्ण झालेला भाग काढून टाकला जातो व नऊवारीसाडीची सहावारी साडी करून नेसली जाते. त्याला धडपा म्हणतात.


*कंबाळ / कयाळ -*

पूर्वी स्त्रियांच्या नऊवारी साड्या असायच्या त्या नेसताना पोटासमोर साडीच्या निर्‍या पोटावर खोचायच्या त्याचा आकार केळीच्या कंबळासारखा व्हायचा किंवा केळासारखा दिसायचा म्हणून काही भागात त्याला कंबाळ तर काही भागात त्याला क्याळ म्हणायचे.


*दंडकी -*

म्हणजे आताचा हाफ ओपन शर्ट. दंडकीला जाड मांजरपाठाच कापड वापरलं जायचं. त्याला पुढे खालच्या बाजूला दोन मोठे खिसे, आतल्या बाजूला एक मोठा खिसा. तसेच त्याला गळ्याजवळ एक चोरखिसा असायचा.


*बाराबंदी -*

पूर्वी ग्रामीण भागात शर्ट नसायचा, जाड मांजरपटच्या कापडाचा छोट्या नेहरू शर्टसारखा आकार असायचा, त्याला बटण नसायची, बटणाऐवजी बांधण्यासाठी बंधांचा वापर केला जायचा. तो शर्ट घातल्यानंतर बारा ठिकाणी बांधावा लागायचा म्हणून त्याला बाराबंदी म्हणत.


*तिवडा -*

पूर्वी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल, म्हैस फिरवली जायची. त्यांना गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत.


*तिफण, चौपण -*

पूर्वी शेतात धान्य पेरण्यासाठी कुरीचा (पाबर) वापर करत. पिकामध्ये जास्त अंतर ठेवायचे असेल तर तिपणीचा वापर करत, अंतर कमी ठेवायचे असेल तर चौफणीचा वापर करत.


*कुळव, फरांदी -*

शेतात पेरण्यापूर्वी शेती स्वच्छ करण्यासाठी गवत, कचरा काढण्यासाठी कुळवाचा वापर केला जात असे. जास्त अंतर ठेवून शेती स्वच्छ करायची असेल तर फरांदीचा वापर करत.


*यटाक -*

कोणतेही औत ओढण्यासाठी शिवाळ/ जू याचा वापर करताना ते जोडण्यासाठी ज्या सोलाचा वापर करत त्याला यटाक म्हणत.


 *शिवाळ -*

पूर्वी शेती नांगरण्यासाठी लाकडी, लोखंडी नांगराचा वापर केला जायचा. नांगर ओढण्यासाठी सहा-आठ बैल लागायचे, ते ओढण्यासाठी बैल शिवाळी ला जोडली जायची.


*रहाटगाडगं -*

पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा किंवा रहाटगाडग्याचा वापर केला जायचा. रहाटगाडग्याला छोटे छोटे लोखंडी डबे जोडून गोलाकार फिरवून विहिरीतून पाणी काढलं जायचं त्याला रहाटगाडगं म्हणतात.


*रहाट -*

पाणी पिण्यासाठी आडातून पाणी काढण्यासाठी रहाटाचा वापर केला जायचा. बादलीला कासरा बांधला जायचा. ती राहाटावरून खाली सोडली जायची. पाण्याने भरली की वर ओढून घ्यायची व जवळ आली की हाताने बाहेर काढून घ्यायचं.


*चाड -*

शेतात धान्य पेरण्यासाठी चारी नळ्यातून सारखं बी पडावं म्हणून चाड्याचा वापर केला जायचा.


*ठेपा -*

पूर्वी जनावरांना बांधण्यासाठी लाकडी मेडक्याचा ( Y आकाराचे लाकूड) वापर करून छप्पर तयार केलं जायचं. पावसाळ्यात छप्पर एका बाजूला कलंडले तर ते पडू नये म्हणून लाकूड उभे करून त्याला आधार दिला जायचा त्याला ठेपा म्हणत.


*शेकरण -*

पूर्वी घरं कौलारू होत. तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी घर गळू नये म्हणून दरवर्षी कौलं व्यवस्थित लावली जायची त्याला शेकरण म्हणत.


*तुराटी -*

तुरी बडवून जी काटकं राहायची त्याला तुराटी म्हणतात. याचा उपयोग घर शेकारण्यासाठी केला जायचा.


*काड -* 

गहू बडवून जी काटकं राहायची त्याला काड म्हणतात. काडाचाही उपयोग शेकरण्यासाठी केला जात.


*भुसकाट -*

धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा राहतो त्याला भुसकाट म्हणतात. याला जनावरं खातात.


*वैरण -*

ज्वारी, बाजरी काढल्यानंतर जो भाग एका जागी बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण म्हणतात.


*जू -*

औत, बैलगाडी, कुळव ओढण्यासाठी बैलाच्या खांद्यावर जे आडवं लाकूड ठेवलं जायचं त्याला जू म्हणत.


*साठी -*

वयाची एक साठी असते आणि दुसरी बैलगाडीची साठी असते या साठीचा उपयोग शेतातील माल, डबा, धान्याची पोती, शेणखत, बाजारचा भाजीपाला वाहण्यासाठी केला जातो. त्याची रचना अशी असते खाली वर बावकाडे असतात. खालच्या वरच्या बावकाडाला भोक पाडून लाकडं ताशीव नक्षीदार उभी केली जातात. त्याला करूळ म्हणतात. करूळाच्या वर एक बावकाड असतं त्यामध्ये करूळी फिट केली जातात. ज्यामुळे साठीची उंची वाढते व शेतीचा जास्त माल बसतो. साठीला खाली आडवी लाकडं टाकली जातात. त्याला तरसे म्हणतात.त्यावर फळ्या टाकल्या जातात. ज्यामुळे साठीतला माल वाहतूक करताना खाली पडत नाही.


*आरपाटा -*

बैलगाडी ओढण्यासाठी दोन चाकांची गरज असते. चाक दणकट होण्यासाठी साठीच्या खाली एक बूट असतं, त्यावर लोखंडी कणा ठेवला जातो. तो कणा साठीच्या बाहेर गोलाकार लाकडू असते, त्याला मणी म्हणतात.त्या मण्यामध्ये कणा बसवला जातो मण्याला लहान लहान भोकं असतात. त्यामध्ये आर लाकडाच्या उभ्या दणकट पट्ट्या बसवल्या जातात. त्या आर्‍यामध्ये बसवतात. आर झिजू नयेत म्हणून त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते त्याला धाव म्हणतात.


*ढकली -*

बैलगाडीच्या साठीच्या पुढच्या तोंडाला एक आडवं लांब लाकूड लावलं जाते त्याला ढकली म्हणतात. या ढकलीचा उपयोग बैल पाठीमागे सरकायला लागला तर तो ढकलीमुळे मागे सरकणे थांबतो.


*दांडी -*

बैलगाडीसाठी चाकं तयार झाली की ती ओढण्यासाठी बुट्याला साठीच्याखाली जो चौकोनी लाकडाचा ठोकळा असतो त्याला तीन भोकं पाडली जातात त्यामध्ये तीन साठीपेक्षा ५/६ फूट लांबीची लाकडं बसवली जातात. त्यावर जू ठेवलं जात. जू आणि बूट याला यटक घातलं जातं. त्यात बैल जोडून गाडी ओढली जाते.


*आळदांडी -*

गाडीला ज्या तीन दांड्या बसवल्या जातात. त्यापैकी दोन ज्वापेक्षा थोड्या लांब असतात. तिसरी दांडी ज्वापेक्षा कमी लांबीची, पण ज्वापर्यंतच्या लांबीची असते. या आळदांडीमुळे जू मागे सरकत नाही आणि यटकामुळे पुढे सरकत नाही.


*पिळकावणं -*

गाडीला किंवा कोणत्याही औताला जे यटाक घातलं जातं ते ढिले राहू नये म्हणून दोन-फूट लांबीचा लाकडाचा दांडा चरकात घालून पिळलं जातो, जेणेकरून यटाक ढिल होत नाही. त्याला पिळकावणं म्हणतात.


*जूपणी, खिळ -*

जूला दोन्ही बाजूला शेवटच्या टोकाला दोन भोकं पाडलेली असतात. त्यात दोन-तीन फूट लांबीचा लाकडी दांडा घालून वरच्या बाजूला जराजाड ठेवला जातो. जुपणीला बारीक रस्सीनं विणलेला ३/४ फुटाचा पट्टा बांधलेला असतो. जेव्हा बैल गाडीला जुंपतात, तेव्हा जू उचललं जातं. बैल जू खाली घेतात ज्वाच्या भोकात दोन्हीबाजूला जुपण्या बसवतात व जुपणीला घेऊन जुपणीत अडकवला जातो.जेणेकरून बैलगाडी चालू झाल्यानंतर बैल इकडं-तिकडं हलत नाहीत. बैल सरळ चालतात. त्यामुळे इकडे-तिकडे झाल्यास खिळ बसते म्हणून जुपणी किंवा खिळ म्हणतात.


*बूट -*

बैलगाडीच्या साटीला आधार व दोन चाक जोडण्यासाठी त्यावर कणा ठेवला जायचा. असे चौकनी लाकूड असायचे त्यालाच बैलगाडी ओढण्यासाठी दोन दांड्या जोडल्या जायच्या त्याला बूट म्हणायचे.


*हिसकी -*

खाली वाय आकार असलेली परंतु लांब काठी असते. त्या काठीचा उपयोग कोणतीही वस्तू दाबून धरण्यासाठी केला जातो त्याला हिसकी म्हणतात.


*कोळप -*

पिकाची आंतर मशागत करण्यासाठी व पिकातील तण काढण्यासाठी ज्या औताचा उपयोग केला जातो त्याला कोळप म्हणतात.


*फड -*

फड तीन प्रकारचे असतात जेथे तमाशा असतो तो तमाशाचा फड, जेथे कुस्त्या चालतात त्याला कुस्त्यांचा फड, जेथे ऊस तोडतात त्या शेताला ऊसाचा फड म्हणतात.


*पास -*

पूर्वी शेतातील तण गवत काढण्यासाठी कुळव किंवा फरांदीचा वापर केला जायचा त्याला दोन जानावळी असायची त्याला पास जोडलेली असायची त्यामुळे जमिनीतून खालून गेल्याने गवत तण मरून जाते.


*वसाण -*

शेतात कुळव चालवताना कुळवाच्या किंवा फरांदीच्या पासत गवत अडकून पास भरकटायची जे अडकलेले गवत असायचे त्याला वसाण म्हणत.


*उंडकी -*

पूर्वी पेरताना तीन किंवाचार नळ असायचे. पेरताना एखाद्या नळातून बी पडत नसेल तर त्याला उंडकी म्हणायचे.


*आडणा -*

वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.


*फण -*

कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात फण बसवला जातो. फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.


*भूयट्या -*

जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं. त्याला भूयट्या म्हणतात.


*रूमण -*

औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.


*उभाट्या -*

जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.


*खांदमळणी -*

बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.


*कंडा -*

बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.


*चाळ -*

बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात.


*शेंट्या -*

बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.


*झूल -*

बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते. त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला झूल म्हणतात.


*आंबवणी, चिंबवणी –*

शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस, लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी म्हणतात.


*वाफा, सारा -*

कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहान आकाराचा असतो त्याला वाफा म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.


*मोट -*

पूर्वी शेतीला पाणी पाजण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लागण्यापूर्वी मोटेचा वापर करत असत. मोट म्हणजे जाड पत्र्याचे एक चौकोनी साधारण ५० लीटर पाणी बसेल असे भांडं तयार करायचे, त्याला खाली तळात एक चौकोनी बोगदा ठेवला जायचा. त्यावर आत मोटेमध्ये उघडझाप होईल असे झाकण असायचे. विहिरीच्या एका भिंतीला दोन उभी व एक आडवं लाकूड कायम केलेले असायचे. त्याच बाजूला जमिनीवर उताराचा भाग तयार केलेला असायचा त्याला धाव म्हणत. जे आडवं लाकूड असायचं त्याला एक चाक बसवलेले असायचं. मोटेच्या वरच्या बाजूला एक साखळी असायची त्याला नाडा बांधायचा. (नाडा म्हणजे जाड ५०/ ६० फूट लांबीचा कासरा) मोटेच्या खालच्या बाजूला एक साखळी असायची त्याला सोल बांधले जायचे नंतर मोट विहिरीत सोडायची. त्याला दोन बैल जोडलेले असायचे. बैल धावेवरून मागे सरत आले की मोट पाण्यात बुडायची. मोट पाण्यात बुडली की मोटेत आत उघडझाप होणारे जे झाकण असते ते उघडायचे. मोट पाण्याने भरली की नाडा, सोल यांना ताण यायचा. मोट भरली कीबैल धावेवरून पुढे हाणायचे. मोट विहिरीच्या वर आली की पाणी थारोळ्यात पडायचे. (थारोळं दगडी बांधकाम केलेला चौकोनी हौद) ते पाणी पाटात, शेतात जायचं. पुन्हा मोट मागे बैल सरकवत न्यायची. पुन्हा वर आणायची ही क्रिया दिवसभर चालवून शेताला पाणी दिलं जायचं.


*पांद -*

शेतात जाण्यासाठी दोन्ही बाजूला झाडी आणि मधून चिखलमातीचा जो रस्ता.


*व्हाण -*

पूर्वी चटणी तयार करण्यासाठी किंवा कालवणाचा मसाला तयार केला जायचा ते जमिनीत रोवलेला मध्ये खोलगट भाग असलेला मोठा दगड असतो. खोलगट असून ते बारीक करण्यासाठी लाकडी मुसळाचा किंवा लोखंडी ठोंब्याचा वापर केला जायचा.


*मांदान -*

स्वयंपाक करताना खरकटं पाणी टाकण्यासाठी चुलीजवळ एक चौकनी खड्डा केला जायचा. त्याला पांढर्‍या मातीचे प्लॅस्टर केलं जायचं त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नव्हतं. त्या मांदानात खरकटं पाणी टाकलं जायचं त्याला मांदान म्हणत.


*दुपाकी घर -*

मध्ये उंच भाग त्याला आड म्हणतात. त्या आडाच्या दोन्ही बाजूला उतरता पत्रा किंवा कौलं टाकून पाणी पडण्यासाठी जे घर असते ते दुपाकी.


*पडचीटी -*

*दुपाकी घराला लागूनच एकाच बाजूला पाणी पडेल असा जो निवारा केला जातो.


*वळचण -*

घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. या वळचणीला जनावरे, लोक निवार्‍याला उभी राहतात.


*गुंडगी -*

गाडग्याचा सर्वात छोटा अवतार.


*उतरंड -*

घरात ज्या छोट्या-छोट्या वस्तू असायच्या त्या या गाडग्यात भरून उतरंडीला ठेवायच्या. उतरंडीची रचना सर्वात मोठं गाडगं तळात नंतर लहान, लहान असे ठेवत १०/११ गाडगी एकावर एक ठेवायची व शेवटच्या गाडग्यावर झाकण म्हणून गुंडगीचा उपयोग व्हायचा.


*पाभरी -*

पितांबराच्या वर नेसण्याचे वस्त्र असते.


*कणींग -*

कळकाच्या कांब्यापासून पिंपासारख्या आकाराचे धान्य ठेवण्यासाठी केलेले असते त्याला आतून बाहेरून शेणाने सारवले जायचे.


*कणगूले -*

कणगीचा छोटा आकार परंतु जाडीने जास्त. टोपलं पूर्वी भाकरी ठेवण्यासाठी कळकाच्या कांब्यापासून घमेल्याच्या आकाराचे तयार केलेले असे.


*चुलवाण -*

उसापासून गूळ तयार करण्यासाठी गोलाकार आतून पोकळ उंच असा भाग बांधलेला असतो त्याच्या एका बाजूला जळण टाकण्यासाठी दरवाजा ठेवलेला असतो.


*काहिल -*

काहिल चुलवाणावर ठेवली जाते. ऊसाचा रस तयार झाला की, तो काहिलीमध्ये टाकला जातो. नंतर चुलवाणाला खालून जाळ घातला जातो. पातळ रसाचे घट्ट गुळात रूपांतर होते. वाफा गूळ तयार होत आला की, काहिलीला दोन लांब लाकडं अडकवली जातात आणि ७/८ लोकांनी ती काहिल ओढत आणून तयार झालेला गूळ वाफ्यात ओतला जातो.


*ढेपाळ -*

गोलाकार पत्र्यापासून तयार केलेले असते. १ किलो, ५ किलो, १० किलो अशा वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यामध्ये गूळ भरण्यापूर्वी आतून तेल लावले जाते. ढेपाळ्यात गूळ भरतात. ढेपाळ्यात गूळ थंड झाल्यानंतर ते ढेपाळे पालथे केले की ढेप बाहेर येते.


*बलुतं -* 

पूर्वी वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार, लोहार, तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत. या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.


*तरवा -*

कोणत्याही रोपाची लागण करण्यापूर्वी वाफ्यामध्ये रेघा ओढून कांदा, वांगी, फ्लॉवर, कोबी जे पाहिजे त्याचं बी पेरलं जातं. पाणी दिल्यानंतर १०/१२ दिवसांनी ते दिसायला लागतं. त्याला तरवा म्हणतात.


*लोंबी -*

गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.


*सुगी -*

ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही पीक काढायला आली की तो काढणींचा काळ होता त्याला सूगी म्हणत.


*खळं -*

कणसापासून ज्वारी तयार करण्यासाठी शेतात गोलाकार भागावरची माती काढून त्याच्या मधोमध एक लाकूड रोवलं जायचं. त्याला तिवडा म्हणत. माती काढल्यावर तिवड्याभोवती बैल गोलाकार फिरवला की जमीन कठीण व्हायची. नंतर त्यावर कणसं टाकून बैल गोलाकार फिरवून त्यातील सर्व ज्वारी निघाली की वावडीवर उभं राहून वाढवायची.


*माचवा -*

पूर्वी ज्वारीच्या शेताची कणसं आल्यानंतर पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला माळा.


*वगळ -*

ओढ्याचा छोटा आकार.


*शिंकाळं -*

मांजर, उंदीर यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी दही, दूध, तूप हे तुळईला अडकवून ठेवण्यासाठी वाकापासून तयार केलेलं असत.


*गोफण -*

शेतात ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी दगड-माती मारण्यासाठी रश्शीपासून तयार केलेली असायची.


*सपार / छप्पर –*

जनावरांच्या संरक्षणासाठी शेतात लाकडं व पालापाचोळ्यापासून तयार केलेलं घर.


*बाटूक -*

ज्वारीच्या शेतात ज्याला कणसं येत नाहीत त्याला बाटूक म्हणतात.


*पिशी -*

ज्वारीच्या कणसाचा हुरडा काढल्यानंतर जो भाग राहातो त्याला पिशी म्हणतात.


*झापा -*

शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी जे सपार तयार केलेलं असतं त्याला लावायचे दार म्हणजे झापा.


*माळवं -*

शेतात केलेला भाजीपाला.


*पावशा -*

पूर्वी एखाद्या वर्षी पाऊस कमी असेल तर खेडेगावात सर्व मुलं एकत्र जमत. गावाबाहेर जाऊन एखाद्या मुलाला नग्न करायचे. त्याच्या कमरेभोवती लिंबाचा पाला बांधायचा. डोक्यावर पाट ठेवायचा. पाटावर पिंड काढायची आणि गावात येऊन प्रत्येक घरापुढे पावशा ये रं तू नारायणा हे गाणं म्हणायचं, मग त्या घरातील स्त्री पाण्याचा तांब्या व भाकरी घेऊन बाहेर येणार पाणी पायावर ओतणार आणि भाकरी चटणी देणार. सर्व जमवलेल्या भाकरी शेतात जाऊन खायच्या.


*कोठी घर -*

वाड्यातले धान्याचे कोठार.


*परस -* 

वाड्याच्या पाठीमागे मोकळी जागा असायची, त्यामध्ये छोटी-मोठी झाड असायची.


*पडवी -*

वाड्यात मधल्या चौकासभोवार जो वाड्याचा भाग असायचा त्याला पडवी म्हणत.


*भंडारी -*

घराच्या भिंतीत, खूप रुंद असलेल्या भिंतीतच एक चौकनी पोकळ भाग ठेवला जायचा त्याला छोटी दार कडीकोयंडा असायचा. यामध्ये घरातील महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायच्या.


*आगवळ -*

लहान मुलींचे केस लोकरीच्या धाग्याने वेणीसारखे बांधावयाचा धागा.


*वज्री -*

आंघोळ करताना अंग घासायची घासणी.


*कथळी -*

चहाची किटली.


*चौपाळे -*

सार्वजनिक जेवणात वेगवेगळ्या वस्तू एकाच भांड्यात ठेवून वाढल्या जायच्या ते भांडे.


*बारनी -*

खिडकीचा छोटा प्रकार असायचा त्याला बारनी म्हणत.


*शेजर -*

पूर्वी ज्वारी, बाजरी, आरगड, गिडगाप अशी धान्याची पिकं काढली म्हणजे एकत्र ठेवली जायची. ती एकत्र ठेवण्यासाठी कडब्याच्या पेंढ्या बांधून पेंढ्या एकावर एक ठेवून खोलगट चौकोन तयार केला जायचा त्याला शेजर म्हणायचे.


*बुचाड -*

पूर्वी पीक काढल्यानंतर वाटायला वेळ नसेल तर कणसासह कडबा एकत्र लावला जायचा तो लावताना कडब्याच्या पेंढ्या खाली कणसं आणि वर बुडके असे लावले जायचे त्याचा आकार खाली रुंद आणि वर निमुळते असे त्रिकोणी आकाराचे लावले जायचे. जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावे याला बुचाड म्हणतात.


*गंज -*

पीक काढल्यानंतर त्यांची कणसं काढून झाली की पेंढ्या बांधल्या जातात. त्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या चार्‍यासाठी होतो म्हणून त्या पेंढ्या एकत्र केल्या जातात व त्या आयताकार रचल्या जातात. निम्म्यात गेल्यानंतर वरचा भाग त्रिकोणी केला जातो. जेणेकरून ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून त्याचे संरक्षण होते. त्याला गंज म्हणतात.


*तलंग -*

कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात.


*कालवड -*

गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर कालवड म्हणतात व पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात.


*रेडकू -*

म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी असेल तर टोणगा/रेडा म्हणतात.


*दुरडी -*

दुरडी कळकाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते. धान्यात माती, कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊनकिंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून जातो.


*हारा -*

कळकाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात, मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.


*बाचकं -*

धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात छोटं पोतं असते त्याला बाचकं म्हणतात.

 

*झोळणा -*

पूर्वी पंचमीला मुली नागोबाला जायच्या तेथे फेर धरून खेळ खेळायच्या जाताना लाह्या, फुटाणे, शेंगदाणे एकत्र करून झोळणा भरायचा व त्यातील भेटेल त्याला थोडं थोडं खायला द्यायचं. झोळणा म्हणजे झोळीच्या छोट्या आकाराचा असायचा.


*मोतीचूर -*

हा एका ज्वारीचाच प्रकार आहे. परंतु हा मोतीचूर तव्यात टाकून भाजला की त्याच्या पांढर्‍या लाह्या तयार होतात. लाह्या तयार होताना त्याचा ताडताड आवाज येतो. त्या तव्याच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याला फडक्याने दाबून धरले जाते.


*इराक्तीला, मुतायला –*

पूर्वी लघवी हा शब्द प्रचलित नव्हता. त्या वेळी स्त्रिया लघवीला जायचं म्हटलं की इराक्तीला म्हणायच्या.


*वटकावण, सोबणी –*

भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा. त्यालाच वटकावण किंवा सोबणी म्हणत.


*खंडी -*

२० मणाची खंडी.


*मण -*

४० शेराचा मण.


*पायली -*

दोन आडबसीर्‍या म्हणजे पायली.


*मापटं -*

एक शेर म्हणजे मापटं.


*चिपटं -*

दोन चीपटं म्हणजे एक मापटं.


*कोळव -*

दोन कोळवी म्हणजे एक चीपट.


*संग्राहक : शिवाजी आबा कदम*

*_▣▬▬▬▬✥⊰⊱✥▬▬▬▬▣_*

Wednesday, August 31, 2022

गणपती

             

 प्रभातवंदन- वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल


प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया


विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका

सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा

वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया


सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला

सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला

तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया


गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता

चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता

रिद्धि सिद्धीच्या वरा दयाळा, देई कृपेची छाया

Saturday, August 13, 2022

अमृत महोत्सव / 75 वर्षे

   

                   देशभक्तीपर गीते         

                               👇

             DOWNLOAD NOW

        


स्वागत गीते
👇





                      रौप्य महोत्सव


रौप्य महोत्सव (silver jubilee - सिल्वर जुबली) म्हणजे २५ वा वर्धापन दिन होय. याला रजत जयंती किंवा पंचवीसवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९७२ मध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला.


रौप्य महोत्सवी वर्ष हे २४ व्या वर्धापन दिनापासून ते २५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.



                     सुवर्ण महोत्सव 


सुवर्ण महोत्सव (Golden jubilee - गोल्डन जुबली) म्हणजे ५० वा वर्धापन दिन होय. याला सुवर्ण जयंती किंवा पन्नासवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९९७ मध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.


सुवर्ण महोत्सवी वर्ष हे ४९ व्या वर्धापन दिनापासून ते ५० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.


                               


            

                   हीरक महोत्सव


हीरक महोत्सव (Diamond jubilee - डायमंड जुबली) म्हणजे ६० वा वर्धापन दिन होय. याला हीरक जयंती किंवा साठवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २००७ मध्ये स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा केला.


हीरक महोत्सवी वर्ष हे ५९ व्या वर्धापन दिनापासून ते ६० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते. षष्ठी पूर्ती ६० वर्ष पूर्ण.


                                



                     अमृत महोत्सव 


अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.


अमृत महोत्सवी वर्ष हे ७४ व्या वर्धापन दिनापासून ते ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.


                              


 

                       शताब्दी 


शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस १०० वर्ष पूर्ण झाल्यास शताब्दी साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, सन २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरा करण्यात येईल.


शताब्दी वर्ष हे ९९ व्या वर्धापन दिनापासून ते १०० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





Thursday, August 11, 2022

देशभक्तीपर गीते

देशभक्ति गीत

                                 देशभक्ति गीत 1)     फिर भी दिल है हिन्दुस्तानी हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी जितना भी तुम समझोगे उ...

ताज्या बातम्य