Friday, July 8, 2022

प्रत्येक पालकास विनम्र निवेदन मुलांना ज्ञानी घडवावे की समजूतदार

  *प्रत्येक पालकास विनम्र निवेदन मुलांना ज्ञानी घडवावे की समजूतदार * 🙏🏻

ताज्या तवाण्या दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांचे जेंव्हा हार्ट ॲटक ने निधन झालं तेंव्हा डॉ.नी दिलेल्या सुचना

१)  बालकांची सकाळपर्यंत झोप पूर्ण होऊ द्या.

२) सकाळी अल्पोपहार दिल्या शिवाय शाळेत पाठवु नका.

३) दप्तराचे वजन बालकांच्या वजनापेक्षा जास्त वजन नसेल याची काळजी घ्या.

४) घरचा अभ्यास पुर्ण करण्यासाठी जबरदस्तीकरु नका योग्य पध्दतीने अभ्यास पुर्ण करुन घ्या.

५) बालकांना शिळे अन्न देऊ नका.

६) शाळेतुन आल्याबरोबर जेवणाचा आग्रह करु नका.त्याला घरच्या वातावरणात मिसळु द्या.

७) बालकांना आराम केल्यावर होमवर्क करण्यास सांगा.

८)त्याला विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधा.

९) त्यांच्या आवडीनिवडी छंद विषयावर बोला.

१०)गोडी गुलामीने त्यांच्याशी थोडावेळ घालवा.

११)त्यांचे छंद जोपासा अती लाड करु नका.

१३) बौध्दिक विकासा बरोबर  शारिरीक विकास होण्यासाठी खेळण्यासाठी वेळ द्या.

१४) बाहेरील पदार्थांपेक्षा घरच्या पदार्थांची सवय लावा.

१५)बाल मनाची पायमल्ली करु नका.

आपणं ४/५वर्षाच्या *कोवळ्या बालकांनामध्ये थेट कलेक्टर, डॉक्टर, इंजिनिअर IPS,IIT,IIM पाहु नका* .

आपणं अगोदर हे पहा कि आपण स्वतः कितव्या वर्षी शाळेत गेलो?काय शिकलो? आपल्या दप्तराचे ओझे किती होते? आपणांस प्रगत साधने किती होती?

विकसित तंत्रज्ञान नसतांना आपण शिकलोच ना? मग का विनाकारण  आपणच आपल्या कोवळ्या बालकांच्या मागे हात धुवून लागाता?

उगीचच आपण त्यांच्या बालमनाची पायमल्ली करून स्पर्धेत ढकलता.आपण त्यांचे बालपण हिरावून घेवून त्यांचा घात करतो असं नाही कां वाटत? विचार करा कोणत्याही गोष्टीसाठी मर्यादा आहेत परिपक्व झाल्या शिवाय झाडाचं पानही गळत नाही,फळ ही तुटत नाही.आणी परिपूर्ण पोषण झाल्या शिवाय जन्माला ही येत नाही.

मग हा खोटा स्पर्धेचा हव्यास का करावा. ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे.बालकाचा विकास हा मानसशास्त्रीय दृष्टीने वेळेवरच होतो. आणि अघोरी प्रयत्न केला च तर त्याचे दुष्परिणामही होतात. 

मग हे सारं समजत असुन सुद्धा जर आपण  बालकांना दबावाखाली आणुन घडविण्याच्या नादात कुठेतरी आतातायी पणा करतो असं होईल . आणि अपेक्षा पुर्ण होण्या ऐवजी उपेक्षा पदरी पडेल. 

म्हणून बालकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करुन त्यांचा सर्वांगीण विकासासाठी थोडी  सुरक्षितता बाळग वागा . म्हणजे सर्वांगीण विकसीत गुणवत्ता प्राप्त होइल.


 एखादा खेळ खेळतच खेळणी एका जागेवर कशी ठेवायच्या हे त्यांना शिकवा. एक टाईमर ठेवा आणि त्यांना गोष्टी व्यवस्थित ठेवण्यास सांगा. त्यांनी वेळेत काम पूर्ण केल्यानंतर त्यांना बक्षीस द्या. जर तुमची मुले नखरे करत असतील तर तुम्ही समजून जा की ते मानसिकरीत्या अस्वस्थ आहे



पुणे : मुलांना शिस्त शिकवण्याकडे दुर्लक्ष करणे प्रत्येक पालकांसाठी डोकेदुखी होऊन जाते. जिथे आमच्या पिढीला शिस्त शिकवण्यासाठी पालक कमी बोलायचे आणि त्यांचे हात पाय अधिक चालायचे, आता जर त्या गोष्टींची चर्चा झाली तर ते फक्त चर्चाच बनून जातात. शिस्त शिकवण्याची जुनी परंपरा आता मुलांना बंडखोर बनवत चालली आहे. येथे आम्ही मुलांना शिस्त लावण्याचे सकारात्मक (पॉझिटिव्ह ) मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे ते केवळ शिस्तबद्धच राहणार नाहीत तर एकमेकांना प्रेम कसे द्यायचे हे देखील शिकतील.

जर मुलं खेळणी अस्थाव्यस्थ पसरून ठेवतातR
जर तुमची मुले नखरे करत असतील  तुम्ही समजून जा की ते मानसिकरीत्या अस्वस्थ आहेत. ते एकतर खूप रागावतात किंवा अत्यंत दुःखी होऊन जातात. अशावेळी त्यांना मारणे योग्य ठरणार नाही. तुम्ही जादू की झप्पी (घट्ट मिठी मारायची/हग करायच) द्या. तुमच्या स्नेह आणि प्रेमाने लगेचच त्यांचे भावनिक चढ-उतार कमी होतील. अशावेळी ते एका क्षणात पाहिल्यासारखे नॉर्मल झाले नाही तर विचारा.

जर मुलं जास्त आगाऊपणा करत असतील तर बर्‍याचदा मुले त्यांच्यापेक्षा वयाने लहान मुलांना किंवा त्यांच जे ऐकतात त्यांना रुबाब दाखवण्यास सुरवात करतात. अशा परिस्थितीत काय करावे? आपण जास्त बोलो तर त्या मुलांना आणखी त्रास होऊ शकतो. त्यांना काही अधिकार देऊन त्यांना स्वतःला महत्वाचे वाटू द्या. यानंतर त्यांच्या वयाची मुले सहसा सहजपणे करू शकत नाहीत असे कोणतेही काम करण्याची जबाबदारी त्यांना द्या. ते जबाबदारीने ते काम करण्यात मग्न होऊन जातील. यावेळी तुम्ही त्यांच्याकडे पहाल तर तुम्हाला जाणवेल की, अशी जबाबदारी दिल्यास तुमच्या मुलात बदल झालेले दिसून येतील. जर मुलगा जेवण करताना ऐकत नसेल तर जर तुमची मुले जेवताना एकत्र नसतील तर तेव्हा त्यांना ठिक करण्यासाठी एक मस्त आयडीया आहे. सहसा मुले खाण्याआधीच नखरे करतात. अशावेळी त्यांना प्रेमाने आग्रह करा की ते सुरवातीला खाण्याचा प्रयत्न करावेत, जर त्यांना ते आवडत नसेल तर ते खात नसतील तरीही चालेल. हो, त्या बदल्यात त्यांना दुसरं काही तरी खायला द्या. हे करत असताना तुम्हाला दोन ते तीन डिश बनवाव्या लागतील जेणेकरून ते भुकेले राहणार नाहीत. या पद्धती फॉलो केल्यास तीन चांगल्या गोष्टी होतील. पहिली म्हणजे मुले भुकेले राहणार नाही, दुसरी म्हणजे जर त्यांनी बर्‍याच डिशची चव चाखली तर त्यांना सगळ्या चव चाखता येतील आणि तिसरी म्हणजे ते खाण्यांच्या नावाने नाटक करणार नाहीत.होमवर्क करणे हे मोठे काम असेल तरबहुतेक मुले होमवर्क करण्याच्या नावाखाली पळून जातात. अशा परिस्थितीत त्यांचे पालक त्यांना सक्तीने अभ्यासाच्या टेबलावर बसवतात. बर्‍याच वेळा मुले गोंधळामध्ये होमवर्क करतात आणि वाईट गोष्ट म्हणजे ते काहीही न करता तासनतास बसून राहतात. बर्‍याच पालकांना त्यांच्या मुलांना चांगल्या मुलांबरोबर तुलना करून त्यांना प्रोत्साहित करण्याची इच्छा असते, यामुळे मुले आणखी चिडचिडी होतात. मुलांसोबत जबरदस्तीने किंवा दुसऱ्यांसोबत तुलना करण्याऐवजी तुम्ही त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण केली पाहिजे.मुलांना वेळेचे महत्त्व समजत नसेल तर काही मुलांना वेळेचे महत्त्व समजत नाही. 'हो, दोन मिनिटात येत आहे' असं म्हणत ते तासन तास खेळू लागतात. जर अशा सवयी बालपणात सुधारल्या नाहीत तर मुले आयुष्यभर सैल होतात आणि काळानुसार गोंधळून जातात. मुले असे करत असल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या आवडत्या कामाचा वेळ कमी करा. जेव्हा त्यांना त्यांच्या आवडीच्या कामासाठी वेळ मिळत नसेल तेव्हा ते इतर वेळेचे महत्त्व समजतील .हेही वाचा - चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा आहे ? मग हे घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा जर मुलांना लबाड (खोटं) बोलायचं सवय लागली असेल तरमुले एका फ़ैंटसी वर्ल्ड (कल्पना रम्य) जगात राहत असतात, ज्यामुळे काही गोष्टींचा विचार न करता खोटे बोलणे त्यांची सवय बनून जाते. जर मुलास कल्पना  आणि रियॅलिटी (वास्तविकते) मध्ये फरक करता येत नसेल तर तो सवयीने लबाड बनतो. वास्तविक जीवनाशी संबंधित गोष्टीही तो जास्त करून सांगत असतो. या सवयीपासून लांब जाण्यासाठी एक गोष्ट करा मुलाला यावेळी योग्य वापर करण्यास शिकवा. त्याला गोष्टी लिहिण्यासाठी प्रेरणा द्या. त्याला एका वहीमध्ये लिहिण्यास सांगा. अशा प्रकारे तो रियल आणि कल्पित जगामध्ये फरक कस करायचं या गोष्टी शिकेल. असे केलया तुमची मुलं एक उत्तम लेखकही  बनतील.



मुलांना ज्ञानी घडवावे की समजूतदार


ज्ञान हे संघर्षाचं प्रतीक आहे तर समजूतदारपणा हे शांततेचे संयमाचे प्रतिक आहे अति विचारांमुळे संघर्ष निर्माण होतो. संघर्षातून वाद तर वादातून आपल्याच माणसापासून दुरावा निर्माण होतो. जो आपणास कोणापासूनही नको असतो.

       तर शांत राहिल्यामुळे संयमात भर पडते. संयमी राहुन विश्व ही जिंकता येत. आपल्याला विश्व जिंकायचे नाही तर आपल्याला आपल्या माणसांची मनं समजूतदारपणे जिंकायची आहेत. संयमी, शांत राहून आपली माणसं आपल्या सहवासात राहतात. मनुष्य आपलं आयुष्य जगतो, व्यतीत करतो ते तो फक्त स्वतःला  करण्यासाठीच. पण आपण स्वतःला सिद्ध कसे करतो हे सिद्ध करण्याच्या नादात लक्षातच येत नाही.  आपण स्वतःला शांत संयमानेहे सिद्ध करू शकतो. ज्ञानाच्या जोरावर  स्वताला सिद्ध करण्याच्या नादात आपल्या माणसात अंतर पडायला नको फक्त इतकच.......


     अति विचारामुळे / ज्ञानामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो व अनुभव देऊनच संपतो. अपेक्षा पूर्ण झाली की अपुरी राहीली, त्याच्यापेक्षा तो शांत संयमी अनुभव महत्त्वाचा. ज्या अनुभवाच्या जोरावर आपण भविष्यकालीन आयुष्य ठामपणे निर्णय घेऊन आनंदाने जगू शकतो .

 म्हणून, 

आपलं आयुष्य आपल्याच मस्तीत शांत संयमानं स्वतःही जगाव दुसऱ्याला जगु द्याव. पण आपल्या आयुष्याच्या मस्तीला शांत संयमाची शिस्तही हवीच.

मग........

.. मुलांना समजूतदार बनवायचं की ज्ञानी ...

             


               प्रविणकुमार चिंचकर

                         🙏🙏





No comments:

देशभक्ति गीत

                                 देशभक्ति गीत 1)     फिर भी दिल है हिन्दुस्तानी हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी जितना भी तुम समझोगे उ...

ताज्या बातम्य